जे. जे. रुग्णालयातील नेत्रविभागाजवळ साकारली डॉ लहाने यांनी 'हरित दृष्टी'...
  • 2 years ago
विख्यात नेत्रशल्यचिकित्साक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आजपर्यंत १ लाख ६२ हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. लाखो रुग्णांना दृष्टी मिळवून देतानाच जे.जे. रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाचे नाव अटकेपार नेऊन ठेवले. त्याचवेळी हाडाचे शेतकरी असलेल्या डॉ लहाने यांनी नेत्रविभागालगत सूर्यफुलाच्या शेतीपासून मक्याची कणसे लावून आपली शेती साधना जपली. त्यांनी आता सुंदर बगीचा तयार केला असून त्यात छोटेसे तळे निर्माण केले आहे. आज तेथे अनेक बदके मुक्तपणे विहार करत असतात. अनेक पक्ष या बागेत दिसतात. या बदकांमधील एका अंध बदकाला डॉ लहाने औषधोपचार करून दृष्टी मिळवून दिली.
Recommended