पुणे : ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची प्रकृती स्थिर

  • 2 years ago
ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरियंटचे पुण्यात एक तर पिंपरी-चिंचवड शहरात ६ नवे रुग्ण आढळले आहेत. नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एक ४४ वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे. या महिलसह आलेल्या तिच्या दोन मुली आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींना सुद्धा ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील ओमायक्रॉन या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या ६ रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी सांगितले आहे.

Recommended