Success Password | राजश्री पाटील

  • 3 years ago
राजश्री पाटील महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील आघाडीचे नाव. राजश्री यांनी, सुरू केलेली महाराष्ट्रातील बचत गटाची चळवळ एका बँकेच्या रूपाने पुढे आली, ज्यामुळे एकीकडे हजारो हातांना काम मिळाले आणि हजारो घरातील चुलीही पेटल्या जाऊ लागल्या. राजश्री पाटील केवळ उद्योग आणि बँकिंग क्षेत्रातीलच नाव नाही, तर एक उत्तम मार्गदर्शक, एक उत्तम समुपदेशक आणि तरुणाईंच्या गळ्यातील ताईत आहेत.
एका महिलेने ठरविले तर ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण राजश्री पाटील आहेत. ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात राजश्री पाटील यांनी उभे केलेले बचत गटाचे जाळे नक्किच नोंद घेण्यासारखे आहे. एक महिला, एक उद्योजिका, एक संघटक या सगळया भूमिका पार पाडणार्‍या राजश्री पाटील यांचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Rajshri_Patil #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama

Recommended