Katraj: कात्रजचा खून झाला; चौकातील बॅनरने चर्चांना उधाण

  • 3 years ago
कात्रज : कात्रज चौकात लागलेल्या कात्रजचा खून झाला या बॅनरने परिसरात चांगलीच चर्चा रंगली. कात्रज चौकातील एका खाजगी प्लॉटवर अज्ञातांनी २०/३०चा मोठा बॅनर लावण्यात आला होता. तो महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून उतरविण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे कात्रज येथील राजकारण तापते आहे काय? की आणखी काही याच्यामागे कारणे आहेत? याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
#katraj #katrajbanner #katrajbannernews #katrajnews #pune #punecity #katrajliveupdates

Recommended