Navi Mumbai (Sanpada) : दुसऱ्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पहिल्या पत्नीच्या मुलाची हत्या

  • 3 years ago
Navi Mumbai (Sanpada) : दुसऱ्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पहिल्या पत्नीच्या मुलाची हत्या

Navi Mumbai (Sanpada) : पत्नीशी झालेल्या वादातून एका बापानं आपल्या चार वर्षीय मुलाला जमिनीवर आपटल्याने सदर मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना सानपाडा (Sanpada) रेल्वे स्थानकावर घडलीय. सकलसिंग हरिदास पवार (वय, 23) असं या पित्याचं नाव असून वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केलीय. या घटनेतील आरोपी सकलसिंग हा सानपाडा हायवे ब्रिज खाली राहणार असून तो व त्याचे कुटुंबीय सर्वजण भीक मागून अथवा मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सकलसिंगला दोन पत्नी असून पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे. या घटनेनंतर आरोपी बापाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिलीय.

#Sanpada #newmumbai

Recommended