महाराष्ट्रात ढगाळ हवामान | उत्तर महाराष्ट्रात गारपीटीचा इशारा | Rain In Maharashtra | Maharashtra

  • 3 years ago
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस ढगाळ नोंदविण्यात येईल. तर उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली. बुधवारी मुंबई किंचित ढगाळ होती. गुरुवारी यात आणखी भर पडली. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढउतार नोंदविण्यात येत असून, गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात आली असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली.

#lokmat #Rain #Rainupdate #Maharashtrarainupdates #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended