Ileana D'cruz करणार होती आत्महत्या जाणून घ्या काय आहे कारण ? | Ileana D'cruz Latest News

  • 3 years ago
नैराश्यचा सामना साऱ्यांचं करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बरेच आव्हानात्मक प्रसंग येतात, अगदी सेलिब्रिटीसुद्धा या परिस्थितीपासून दूर राहू शकले नाहीत. करण जोहर, दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन या सेलिब्रिटींनीही त्यांच्या आयुष्यात नैराश्यामुळे बऱ्याच नकारात्मक गोष्टींचा सामना केला होता. याच सेलिब्रिटींमध्ये आता अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या नावाचाही समावेश झाला आहे. चित्रपटसृष्टीत आपल्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता आणि कशा प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार येत होते, याविषयीचा उलगडाही तिने केला. ‘मेंटल हेल्थच्या २१ व्या वर्ल्ड काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. ‘बऱ्याचदा लहानसहान गोष्टींमुळे माझ्या मनात संकोचलेपणाची भावना यायची. त्यावेळी माझ्या अंगकाठीमुळे मला बऱ्याच गोष्टी सतावत होत्या. माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड होता. मी त्यावेळी खूपच हताश असायचे. कारण त्यावेळी मला कल्पनाच नव्हती की, मी नैराश्य आणि ‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ने ग्रासलेले होते. माझ्या विचारांची चक्र वेगळ्याच वाटेवर फिरत होती. इतकेच नव्हे तर मी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता’, असे इलियाना म्हणाली

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews