दादा vs भाऊ; 'महा'संग्रामाची ठिणगी | Ajit Pawar Vs Devendra Fadnavis | Maharashtra News

  • 2 years ago
२३ नोव्हेंबर २०१९... दोन नेत्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला होता... देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार... अर्धी जनता साखरझोपेत असताना या जोडीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती... जे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं, ते घडलं होतं... अर्थात, हे सत्तेचं गणित जितक्या वेगात जुळलं, तितक्याच वेगात विस्कटलंही... अडीच दिवसांत सरकार पडलं... नवं सरकार आलं... राजकीय टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले... पण अजितदादा आणि देवेंद्रभौ यांनी एकमेकांवर कधीच टीका केली नाही... ठरवून की न ठरवता माहीत नाही, पण ते परस्परांबद्दल सॉफ्ट दिसले... मात्र, आता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या एका गहन विषयावरून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय... तो विषय आहे, वैधानिक विकास महामंडळांचा ... या विषयावरून आधीच पश्चिम महाराष्ट्र विरूध्द विदर्भ - मराठवाडा असा वाद निर्माण झाला होता. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी झाला म्हणून ही महामंडळं स्थापन झाली होती. या महामंडळांना वेगळा निधी देण्यात येत होता. पण यामुळे पश्चिम महाराष्ट्राचं नुकसान होत असल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्रातले नेते आधीपासूनच करत होते. त्यात आता ठिणगी पडली आहे देवेंद्र फडणवीस विरूध्द अजित पवार वादाची .. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत या मुद्द्याला हात घातला आणि नाव न घेत अजित पवारांवर टीका केली ...

#lokmat #Devendrafadnavis #Ajitpawar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended