नृत्यांगना Vishakha Kaleची राहत्या घरी आत्महत्या |आर्थिक परिस्थितीला कंटाळून संपवलं जीवन | Pune News

  • 3 years ago
अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे (वय 21) यांनी बुधवारी (6 ऑक्टोबर) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. पुण्यातील हडपसर परिसरात त्या राहण्यास होत्या. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी तिचे आई-वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार वर्षापूर्वी विशाखाचा अपघात झाला होता. या अपघातामुळे तीच्या चेहर्‍यावर काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मागील एक वर्षभरापासून नैराश्यात होती. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
#Hadapsarnews #Vishakhakale #VishakhaKalesuicide #Punenews #Suicideinpune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended