शिवसेना सोडून 'बाळासाहेब' भाजपात का आले? Why did 'Balasaheb Sanap' left Shiv Sena and join BJP?

  • 3 years ago
महाराष्ट्रात आमदारांच्या, नेत्यांच्या फोडाफोडीची भाषा गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक पक्षांकडून केली जाते. अनेक आजी-माजी आमदारांनी उड्या मारायला सुरुवातही केली आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंना फोडून राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला. तर आता भाजपने शिवसेनाचा मोठा नेता फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी कमळ हातात घेतलंय. आगामी स्थानिक स्वराज्य आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जातंय. नाशिक महानगरपालिकेत भाजपला त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सानप यांच्यामुळे किमान १५-२० नगरसेवक सहज निवडून आणता येतात, असं सांगितलं जातं. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. आणि पुन्हा आता भाजपात आले आहेत. अनेक वर्ष ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक होते. ते नाशिक महानगरपालिकेतील भाजपचे पहिले महापौरही राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आगामी महानगरपालिका निवडणुकीत हा धक्का मानला जातोय.

#lokmat #BalasahebSanap #BJP #Uddhavthackeray #Devdendrafadnavis #Chandrakantpatil #Girishmahajan #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended