कोकणाला 'महा' चक्रीवादळाचा फटका | सुट्टीत पर्यटन 'थंड' | Kokan
  • 3 years ago
क्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळपासून समुद्री वातावरणात बदल झाला असून समुद्री लाटांचा जोर वाढला आहे. याचा फटका किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस बसला आहे. खराब वातावरणामुळे प्रवासी वाहतूक बंद केल्याने जेटीवर किल्ला दर्शनासाठी शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
अरबी समुद्रातंर्गत बदलांचा मोठा फटका यावर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रीय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेग वाढला असून किनार्‍यावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. दिवाळी सुटीच्या काळात काही प्रमाणात येथे पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र खराब वातावरणाचा फटका पर्यटनास बसला असून आज किल्ला दर्शनासाठी जेटीवर दाखल झालेल्या शेकडो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन घ्यावे लागत आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मालवणात पर्यटकांचा ओघ असून गुरुवारी दोन हजार पर्यटकांनी किल्ले दर्शन केले. गुरुवारी वातावरण निवळल्याने होडी सेवा सुरळीत ठेवण्यात आली होती.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #kokan #rain

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended