NCP Avdhut Tatkare जाणार Shivsena त , काय होणार Roha चे ? | Mumbai

  • 3 years ago
सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे हे विधान परिषदेचे आमदारा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. सुनिल तटकरे यांनीच त्यांना उमेदवारी मिळवून दिली असं बोललं जात आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत काकाकडे हट्ट करून उमेदवारी पदरात पाडून घेतली आणि अवघ्या ३५ मतांनी निवडून आलेले हे आमदार एकेकाळी सुनिल तटकरे यांचे वारसदार म्हणून ओळखले जात होते. रोह्याचे माजी नगराध्यक्ष असलेले अवधूत यांचा प्रशासन आणि पक्षात दबदबा होता. आक्रमक व्यक्तीमत्वामुळे तरूण वर्गात ते लोकप्रिय आहेत. खरं तर सुनिल तटकरे हे जेव्हा विधान परिषदेवर निवडून गेले, त्यावेळी विधान सभेसाठी त्यांना मुलगी आदिती तटकरे हिला तिकीट द्यायचं होतं. पण अवधूतने हट्ट केल्यामुळे त्यांना आदितीऐवजी अवधूतचा हट्ट पूर्ण करावा लागला. मात्र मागच्या विधानसभा निवडणूकीत अवधूत याना तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेली चुलत बहीण आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी अवधूत यांच्या प्रचाराक़डे पाठ फिरवली होती.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended