डॉ. मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा का काढली ? | Lokmat News
  • 3 years ago
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना एसपीजी संरक्षण मिळत होतं. गृहमंत्रालयानी हे संरक्षण कवच काढून त्यांना झेड प्लस ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. सध्या देशात चार जणांना एसपीजी संरक्षण दिलं जातं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वाडरा याना हे संरक्षण दिलं जातं. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार दरवर्षी एसपीजी संरक्षण देणाऱ्या व्यक्तीला किती धोका आहे याचा आढावा घेतला जातो. एसपीजी अँक्ट मध्ये याचा उल्लेख आहे. त्यानुसार दरवर्षी याचा आढावा घेतला जातो. हा आढावा घेतल्यानंतरच डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सुरक्षा कवच Z प्लस पर्यंत कमी करण्यात आलंय.
काय आहे एसपीजी अॅक्ट ......
स्पेशल प्रोटेक्शन अॅक्ट हा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मंजूर करण्यात आला. १९८८ साली मंजूर झालेल्या या कायद्यांतर्गत सुरूवातीला फक्त विद्यमान पंतप्रधानांना अशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले होते. १९८९ साली विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांथी यांचे हे सुरक्षा कवच काढून घेण्यात आले होते. पण १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि त्यात माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियाना हे सुरक्षा कवच देण्याचे ठरले. पण असे कवच केवळ दहा वर्षांसाठी देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. २००३ मध्ये पुन्हा या कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळत असलेल्या सुरक्षा कवचाचे नुतनीकरण दरवर्षी करण्याची तरतूद करण्यात आली. t डॉक्टर मनमोहन सिंग यांना गेली पाच वर्षे एसपीजी सुरक्षा कवच होते. पण त्याचे नुतनीकरण करताना ते आता Z प्लस पर्यंत कमी करण्यात आले आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Recommended