Lokmat News | गुजरातच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा ला जोरका झटका धिरेसे लगा | BJP | News

  • 3 years ago
गुजरातमधल्या ४३ नगरपालिकांमध्ये भाजप तर २७ नगरपालिकांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम पीच असणाऱ्या वडनगरमध्ये भाजपनं २८ पैकी २७ जागा जिंकल्या आहेत.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचा बालेकिल्ला असलेल्या राजकोटमधल्या ५ नगर पालिकांपैकी ३ ठिकाणी भाजप आणि २ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकोट जिल्ह्यातल्या ७ जागांपैकी ४ जागांवर भाजपचा आणि ३ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला होता. मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ७५ पैकी ११ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला होता. यावेळी मात्र काँग्रेसची आकडेवारी १६ सिट वाढून २७ झाली आहे. २०१६ साली झालेल्या १२३ नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला १०७ जागांवर विजय मिळाला होता. २२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये भाजपची दमछाक झालेली पाहायला मिळाली होती. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended