Lokmat News | सर्वात कमी वयात याने उडवली भल्याभल्या फलंदाजांची झोप बनला नंबर 1 | Lokmat Marathi News

  • 3 years ago
झिम्बाब्वे विरोधात झालेल्या सीरिजमध्ये १६ विकेट्स घेणारा राशिद खान वन-डे रँकिंगमध्ये बुमराहसोबत संयुक्तरित्या क्रमांक एकवर आला आहे. बुमराह आणि राशिद खान या दोघांचेही गुण ७८७ आहेत. यासोबतच राशिद खानने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कमी वयात आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा राशिद पहिला क्रिकेटर बनला आहे. राशिदने १९ व्या वर्षात आणि १५२ दिवसांत अव्वल स्थान गाठलं आहे.यापूर्वी पाकिस्तान च्या सकलेन मुश्ताकने २१ वर्ष आणि १३ दिवसांचा असताना अव्वल क्रमांक गाठला होता. राशिदने आपल्या शेवटच्या १० मॅचेसमध्ये ७.७६च्या सरासरीने ३३ बळी घेतले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended