Lokmat News | शेतक-यांना गुन्हेगाराची वागवणूक, ही तर शेतकऱ्यांची थट्टा | Lokmat Marathi News Update

  • 3 years ago
राज्याला नुकतेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले होते. गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानी बाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिका-यांमार्फत पंचनामे सुरू असून उमरगा तालुक्यातील पंचनामे वादग्रस्त ठरलेत. शेतक-यांच्या हातात दिलेल्या  नावाच्या पाटय़ांसोबत त्यावर नुकसानाची माहिती असते. असे त्यांचे छायाचित्र काढले जात आहे.गुन्हेगाराचे छायाचित्राप्रमाणे शेतक-यांचे छायाचित्र काढले जात असल्याने हा कारभार पारदर्शक असला तरी ही पद्धत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended