Lokmat News | नाशिकमध्ये माणुसकीचे मन हेलावणारी दर्शन कुत्र्याच्या मदतीला पांगुळ गाडा | Lokmat

  • 3 years ago
पंधरा दिवसांपूर्वी मेरी म्हसरुळ रस्त्यावर एका भरधाव वाहनाच्या टायरखाली येऊन चिंटू नावाचं हे कुत्र्याचं पिल्लू चिरडलं गेलं. या अपघातात कुत्र्याचे मागचे दोन्ही पाय निकामी झाले. या परिसरात राहणाऱ्यांनी कुत्र्याला तातडीने जखमी अवस्थेतील मंगलरुप गोशाळेत नेले आणि त्याच्या पायाचे एक्सरे काढले. दोन्ही पायांचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. कुत्रा मागच्या पायावर चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.पांगुळ गाडा तयार करण्या साठी नाशिकमधील तरुणांनी लहान मुलांच्या सायकलची मागील दोन चाकं, प्लास्टिक च्या पाईपचे तुकडे असे साहित्य गोळा करून पांगुळगाडा तयार केला आणि त्यासहाय्याने छोट्या चिंटूने मॉर्निंग इव्हिनिंग वॉक सुरु केला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.जसेजसे हे पिल्लू मोठे होईल, तसतसे त्याच्या पायात ताकद येईल आणि त्याचे चालणे अधिक सहज होईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended