आता लवकरच पासपोर्टमध्ये होणार हे प्रमुख बदल | New Changes in Passport | Lokmat Marathi News

  • 3 years ago
आता नवीन नियमांनुसार पासपोर्ट तयार केले जातील. पासपोर्टच्या नवीन व्हर्जनमध्ये शेवटचे पान खाली ठेवण्यात येईल. पूर्वी या पानावर अड्रेस सहित लीगल पॅरेंट्सचे नाव, आई, पत्नी, पतीचे नाव आणि जुन्या पासपोर्टचा नंबर इत्यादी माहिती होती. मात्र नवीन पासपोर्टमध्ये हे पान आता नसेल. त्यामुळे तुम्ही पासपोर्टचा अड्रेस प्रुफ म्हणून वापर करू शकणार नाही.आतापर्यंत तयार झालेले सर्व पासपोर्ट मान्य आहेत. जेव्हा या पासपोर्टची व्हॅलिडिटी संपेल तेव्हा नवीन पासपोर्ट तयार केला जाईल. पूर्वी फिजिकल होणारे पोलीस व्हेरिफिकेशन रद्द करून ते ऑनलाईन करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट बनवण्यासाठी लागणार वेळ अजून कमी करण्यात येईल. आता पासपोर्टवर आई-वडिलांचे नाव आणि अड्रेस असलेले पान नसेल. ते शेवटचे पान रिकामे ठेवण्यात येणार आहे.ECR कॅटेगरीत असलेल्या लोकांना निळ्या ऐवजी नारंगी रंगाचा पासपोर्ट मिळेल.नॉन ECR कॅटेगरीतील लोकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगाचा पासपोर्ट मिळेल. या व्यवस्थेत गव्हर्नमेंट ऑफिसर्संना सफेद रंग, डिप्लोमेंट्सला लाल रंग आणि अन्य लोकांना निळ्या रंगाचा पासपोर्ट देईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended