Lokmat Health Tips | ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यासाठी आहाराच्या खास टिप्स | Lokmat News
  • 3 years ago
स्त्रियांना घर आणि ऑफिसचा डोलारा लिलया पार पाडायचा असेल तर तुम्हाला स्वतः फिट, हेल्दी असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स.. 
सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी आवश्यक असतो.शक्यतो घरगुती पदार्थ नाश्तासाठी उत्तम. तुम्ही कॉर्नफ्लेक्सही घेऊ शकता. किंवा एखादे फळ खा त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. ऑफिसमध्ये मधल्या वेळी भूक लागल्यास सुकामेवा खा.शक्यतो घरचे अन्न खा. पोळी-भाजी, डाळ, दही, हिरव्या पालेभाज्या यांसारखे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. त्याचबरोबर सलाड अवश्य खा.८-९ तास ऑफिसमध्ये असल्याने संध्याकाळच्या वेळेसही भूक लागते. अशावेळी बाहेरचे अरबट चरबट खाले जाते. समोसा, वडा अशा अनहेल्दी पदार्थांची पोटात भर पडते. अशावेळी सुकामेवा, उकडलेली कडधान्ये, कडधान्यांचे सलाड अशा पदार्थांचा आस्वाद घ्या. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.भारतात रात्रीचे जेवण पोटभर घेण्याची सवय आहे. इतकंच नाही तर पोटभर खायचं आणि लगेच झोपायचं, ही अगदी अनहेल्दी सवय. या उलट रात्री कमी मसालेदार, हलके अन्न घ्या. भाज्या, चपाती, वरण, भात असे हलके अन्न घ्या. त्यामुळे शरीराचे पोषण तर होईलच पण अन्नपचन सहज होईल. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended