उत्तर कोरियाचा हुकूमशहा Kim Jong-un याच्या क्रूरतेच्या आणखी गोष्टी जगासमोर आल्या | Lokmat News

  • 3 years ago
[12:22 PM, 1/18/2018] +91 80874 51231: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याच्या क्रूरतेच्या गोष्टी जगाला काही नवीन नाहीत. आपल्या अधिकाऱ्याला तोफेच्या तोंडी देणे, काकाच्या अंगावर कुत्रे सोडून त्याला ठार मारणं, युएनला भीक न घालता वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी करणे अशा एक न अनेक गोष्टी या क्रूर हुकूमशहाच्या विक्षिप्तपणाची उदाहरणं आहेत. किमबद्दल अनेकांना कुतूहल आहे, नुकत्याच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी उघड केल्या आहेत. किम जाँगचे वडिल किम जाँग इल हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा होते. किमचं बालपण हे स्विर्त्झलंडमध्ये गेलं. स्विर्त्झलंडमध्ये तो नाव बदलून शिक्षण घेत होता. स्विर्त्झलंडमध्ये किमची ओळख लपवण्यात आली होती. तिथे तो उत्तर कोरियाच्या दूतावासातील एका कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून वावरत होता. त्याला शाळेतील सर्वच मुलं पॅक उन या नावानं ओळखायची असं त्याच्या वर्गमित्र मिकायलोनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended