सरते शेवटी मुंबई खड्ड्यात घालणाऱ्या 96 दोषी अभियंत्यांना पालिकेचा दणका

  • 3 years ago
मुंबईतील ३४ रस्त्यांचा पालिकेचा चौकशी अहवाल आज आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला आहे. यात १०० पैकी ९६ अभियंते दोषी आढळले असून केवळ 4 अभियंते निर्दोष असल्याचं समोर आलं आहे.मुंबईसह परिसरातील २३४ रस्त्यांपैकी ३४ रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी १०० अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. १००पैकी फक्त चारच अभियंते निर्दोष आढळले आहेत, तर तब्बल ९६ अभियंत्यांनी मुंबईच्या रत्यांना खड्ड्यात घातल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील उर्वरित २०० रस्त्यांच्या कामातील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याच कामही प्रगती पथावर असून त्याचाही अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended