या’ अभिनेत्याने धर्मेंद्र ह्यांना सुखद धक्का | Latest Bollywood Update | Lokmat News

  • 3 years ago
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची शुक्रवारी त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन भेट घेतली. सलमानच्या या सरप्राईज भेटीमुळे धर्मेंद्र खूपच खूश झाले. त्यांनी त्यांचा हा आनंद सोशल मीडियावर भेटीचा एक फोटो शेअर करत व्यक्त केला आहे.धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून सलमान सोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. धर्मेंद्र यांनी ट्वीट करत ‘आमच्या फार्महाऊस वर तू दिलेल्या सरप्राईज भेटीमुळे मला खूपच आनंद झाला आहे. तू मला माझ्या मुलाप्रमाणेच आहेस’ अशा शब्दांत त्यांनी सलमान साठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended