आमंत्रण नसतांना सुद्धा आला हा पाहुणा, सगळ्यांची उडाली भंबेरी | Lokmat News

  • 3 years ago
भंडारा जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात भर दिवसा एका वाघाने लग्नाला हजेरी लावली. सर्वप्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बाला घाट जिल्ह्यातील आगरी येथे आढळला होता. त्यानंतर त्याने मध्यप्रदेशातीलच मसुखाप येथील लग्नाला हजेरी लावली. वाघाला पाहताच गावकऱ्यांनी पळ काढला. अनेकांनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतला. वाघांनी ह्याच गावातील एका वास्तुशांती ला देखील हजेरी लावली. ह्या मुळे गावात दहशतीचे वातावरण होते.
मध्यप्रदेशातील सगळे कार्यक्रम आटपून ह्या वाघाने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे,भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात ह्या वाघाने एका महिले वर हल्ला करून तिला जखमी केले आहे. दरम्यान हा वाघ शारीरिक दृष्ट्या अपंग असल्याचं वन्यजीव प्रेमींचं म्हणणं आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended