म्हैसूरच्या राजघराण्यात 400 वर्षांनी जन्मला राजपुत्र | Lokmat Marathi News

  • 3 years ago
राजघराणी व त्यांचा इतिहास याविषयी आजही लोकांना मोठेच कुतूहल वाटत असते. म्हैसूरचे वडियार राजघराणे ही असेच लोकांच्या आकर्षणा चे केंद्र असते. हे राजघराणे 4 शतकांपासून त्यांच्या वंशात मूल जन्माला येत नव्हते. म्हैसूरचे 27 वे राजे यदुवीर वडियार यांचे लग्‍न 27 जून 2016 रोजी डुंगरपूरची राजकुमारी तृषिका सिंह यांच्याशी झाले होते. तृषिका यांनी नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे.दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार आणि राणी प्रमोदा देवी यांना अपत्य नव्हते. यासाठी राणी प्रमोदा देवींनी आपल्या पतीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा यदुवीर यांना दत्तक घेतले आणि वडियार राजघराण्याचा वारस बनवले. हे घराणे राजपरंपरा पुढे नेण्यासाठी 400 वर्षांपासून कुटुंबातील इतर सदस्यांच्या मुलांना दत्तक घेत आले आहे. एका माहितीनुसार, 1612 मध्ये दक्षिणेतील सर्वात शक्‍तिशाली विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर वडियार राजाच्या आदेशाने विजयनगरची धनसंपत्ती लुटण्यात आली होती. त्या काळी विजयनगरच्या तत्कालीन महाराणी अलमेलम्मा पराभवानंतर एकांतवासात होत्या, परंतु त्यांच्याजवळ पुष्कळ सोने, चांदी आणि जडजवाहीर होते. वडियारने महाराणीं कडे दूत पाठवून सांगितले की, हे दागिने आता वडियार साम्राज्याचा भाग आहेत, यामुळे ते देण्यात यावेत. अलमेलम्माने जेव्हा दागिने द्यायला नकार दिला, तेव्हा शाही लष्कराने बळजबरी खजिन्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दु:खी होऊन अलमेलम्माने कथितरीत्या शाप दिला की, ज्याप्रकारे तुम्ही लोकांनी माझे घर उद्ध्वस्त केले आहे, त्याच प्रकारे तुमचेही राजघराणे संतानविहीन होईल आणि या वंशाची वेल कधीच वाढणार नाही. शाप दिल्यानंतर अलमेलम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आजही महालात या शापापासून वाचण्यासाठी अलमेलम्माची मूर्ती देवीच्या रूपात पुजली जाते; परंतु यामुळे काही खास फरक पडला नव्हता. मात्र, आता देवी चामुंडेश्‍वरीच्या अनुष्ठानाने व तिच्या कृपेने राजघराण्याचा शाप हटला, असे म्हटले जात आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended