शेवटी सलमान खान अर्शी खानवर भडकला | Salman Khan Latest News

  • 3 years ago
बिग बॉसच्या ११ व्या पर्वात दिवसेंदिवस वाद वाढत चालले आहेत. प्रत्येक स्पर्धक एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसताना अर्शी खानने यात एक पाऊल पुढे जात शिल्पा शिंदेच्या आईचाच अपमान केला आहे. तिच्या या वागण्यामुळे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खान अर्शीवर प्रचंड भडकला असून त्याने तिला ‘वाह्यात औरत’ म्हटले आहे.गेला आठवडा स्पर्धकांसाठी फारच इमोशनल होता. स्पर्धकांचे नातेवाईक घरात आले होते. ज्यावेळी नातेवाईक घरात येतील तेव्हा स्पर्धकांना एका जागेवर स्तब्ध अवस्थेत उभे राहायचे होते. अर्शी खानचे वडील जेव्हा घरात आले त्यांनी चुकून शिल्पा शिंदेला ‘हिना’ अशी हाक मारली पण त्यामुळे गोंधळलेल्या शिल्पाने हसत तिचे डोळे फिरवले. अर्शीला तिची हिच गोष्ट खटकली व त्यानंतर ती शिल्पाला उलटसुलट बोलली. अर्शी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने शिल्पाची आई जेव्हा घरात आली तेव्हा तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत सरळ किचनमध्ये निघून गेली. त्यानंतरही शिल्पाच्या आईने अर्शीला ऑल द बेस्ट म्हटले तेव्हाही ती काहीच बोलली नाही. तिच्या या वागण्याने शिल्पाच्या आईचा अपमान झाला. अर्शीच्या या वागण्यामुळे सलमान संतापला असून तो आजच्या विकेंड का वारमध्ये अर्शीला ओरडतानाचे एका व्हायरल

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended