सोनियांना मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Lokmat Marathi News

  • 3 years ago
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. 'सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य लाभो,' असं ट्विट मोदींनी केलं आहे.सोनिया गांधी यांचा त्यानंतर गुजरातमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही मोदी यांनी ट्विटरद्वारे गुजरातच्या मतदारांना केलं. 'सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभो हीच प्रार्थना,' असं ट्विट मोदींनी केलं. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनीही सोनिया गांधी यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'समर्पण, त्याग, बलिदान आणि कठीण परिस्थितही असीम धाडस दाखविणाऱ्या मॅडम सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच 10 जनपथ या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. ढोल-ताशे वाजवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews