फलनदाजांच्या यादीत विराट कोहली आहे या क्रमांकावर | Virat Kohli News | Lokmat News

  • 3 years ago
फलंदाजीत भन्नाट सूर गवसलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत दुसरा क्रमांक पटकाविला. एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अव्वल स्थानी आहे.

क्रिकेटमधील तीनही प्रकारांमध्ये एकाच वेळी अव्वल स्थान पटकाविण्याची किमया यापूर्वी अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने केली होती. आता कोहलीलाही अशी कामगिरी करण्याची संधी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात 243 धावांची खेळी केली होती. दुस-या डावात त्याने 50 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या या मालिकेत कोहलीने एकूण 610 धावा फटकाविल्या. या कामगिरीमुळे त्याचे क्रमवारीतील स्थान सुधारले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended