भूकंपाचे तीव्र झटके | Delhi Latest News | Lokmat Marathi News | Earthquake News

  • 3 years ago
दिल्ली आणि एनसीआरला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. उत्तराखंडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के दिल्लीसोबतच तामिळनाडूतही जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के देशभरात अनेक ठिकाणी जाणवले. रात्री पावणेनऊच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले.

भारतीय हवामान विभागाने या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये असल्याची माहिती दिली. जमिनीच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असेही हवामान विभागाने सांगितले. याआधी युरोपियन भूकंपमापन विभागाने उत्तराखंडमधील देहरादूनच्या पूर्वेला 121 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती दिली होती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended