फक्त माणसांचेच नाही तर मुक्या जीवांचेही रक्षक आहेत पोलीस | Police helpline | Lokmat News

  • 3 years ago
फक्त माणसांचेच नाही तर मुक्या जीवांचेही रक्षक आहेत पोलीस
बंगळुरू पोलीस स्टेशनमधील एक-दोन नव्हे तर तब्बल १५ पोलीस या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी धावून आले.
बंगळुरू पोलिसांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहेत. पोलिसांनी फक्त नागरिकांपुरतं आपलं कर्तव्य मर्यादित न ठेवता ते एका भटक्या श्वानाचा मदतीसही तितक्याच तत्परतेनं धावून आले आहेत.एका भटक्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या मडक्यात अडकलं होतं. परिसरातील काही व्यक्तींनी ट्विट करत पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा बंगळुरू पोलीस स्टेशनमधील एक-दोन नव्हे तर तब्बल १५ पोलीस या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी धावून आले. त्यांनी करवतीच्या साह्यानं प्लास्टिकच्या मडक्याचा पुढचा भाग कापला. त्यामुळे या श्वानाला श्वास घेणं सोपं झालं. कुत्र्याला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेत पोलिसांनी अलगद तीक्ष्ण शस्त्रांच्या साह्यानं प्लास्टिकचं मडक कापून काढलं आणि या मुक्या जीवाची सुटका केली. पोलिसांच्या मदतीमुळे या मुक्या जीवाचे प्राण वाचले.
एकीकडे गेल्या वर्षभरात भटक्या कुत्र्यांना निदर्यपणे मारून टाकण्याच्या घटना समोर येत असताना या पोलिसांनी मात्र या प्राण्याला मदत करून अजूनही भूतदया जिवंत आहे हे दाखवून दिलं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended