या देशात चक्क कुत्र्यांना प्रवेश नाही | Japan Latest News | Dogs Latest News

  • 3 years ago
जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी याठिकाणी झालेल्या अणूबॉम्ब हल्ल्यानंतर जपानी लोकांनी उध्वस्थ झालेले जपान पुन्हा उभे करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या दरम्यान त्यानी जवळपास एक पिढी गमावली पण ते तितक्याच ताकदीने पुन्हा देश सावरण्यासाठी सज्ज झाले.आता हा देश तब्बल 6852 बेटांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी अनेक बेटं तर जेमतेम एक किलोमीटर इतक्या लहान आकाराची आहेत. या बेटांवरील जीवसृष्टीबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. आता जपानच्या अशाच एका बेटावरील एक गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. या बेटावर एकूण 100 लोक राहतात आणि तिथल्या मांजरांची संख्या आहे 400. आता याहून विशेष गोष्ट म्हणजे इतक्या मांजरी असल्यामुळे या बेटावर कुत्र्यांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. आता या इतक्या मांजरी कुठून आल्या. त्यांच्याकडे कोण आणि कसे लक्ष देते. यांविषयी मात्र अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended