आता 2020 मध्ये देशात सुरु होणार इंटरनेटचा हा प्रकार । व्हिडिओ पहाल तर व्हाल थक्क

  • 3 years ago
जग बदलतंय तसं तंत्रज्ञानही बदलतंय. 2 जी, 3 जी, 4 जीनंतर आता देशात लवकरच 5जी तंत्रज्ञान येणार आहे. 2020 पर्यंत देशात 5 जी सुरू करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. या सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या स्वीडनमधील 'एरिक्सन' कंपनीनं नुकतंच त्याचं सादरीकरण केलंय. ही सेवा सुरू करण्यासाठी कंपनीनं एअरटेलशी भागीदारीही केली आहे. एरिक्सनच्या 5 जी टेस्ट बेड आणि 5 जी न्यू रेडिओ (एनआर) तर्फे हे सादरीकरण करण्यात आलं. त्यात अत्यंत कमी वेळात म्हणजेच 3 मिली सेकंदांसह 5.7 गीगा बाइट प्रती सेकंद वेग मिळाला. दरम्यान, 2020 पर्यंत 4 जी सेवा सुरू करण्याचं सरकारचं लक्ष्य पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं एरिक्सननं म्हटलं आहे. सुरुवातीला 2 जी, त्यानंतर 3 जी आलं. आता 4 जीचं युग आहे. आता तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होत आहे. 5 जी सेवेसाठी दूरसंचार कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आता 2020 पर्यंत 5 जी सेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यामुळं दूरसंचार कंपन्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended