मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांवर सवलतीचा वर्षाव | Latest Mobile Updates

  • 3 years ago
रिलायंस जिओ च्या आगमनानंतर दूरसंचार कंपन्यांमध्ये ग्राहक टिकवण्यासाठी तुंबळ युद्ध सुरु आहे. यामध्ये आपलीच सरशी व्हावी यासठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करीत असून त्यासाठी ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. जिओ च्या रीकॉर्ड तोड ऑफर्स ना तोंड देण्यासाठी अन्य कंपन्यांनी इ-कॉमर्स कंपन्यांबरोबर स्वतःला जोडून घेण्यास सुरवात केली आहे. अशा सलग्नतेतून ग्राहकांना सवलती दिल्या जात आहेत. एखाद्या मोबाईल कंपनीचे कनेक्शन घेतल्यावर आता त्या कंपनीकडून अनेक मूल्यवर्धित सेवा दिल्या जातील. ज्यामध्ये मोबाईलच्या सहाय्याने बिल भरणे, रिचार्ज करणे यांसारख्या वित्तीय सेवांबरोबरच चित्रपट व गाणी डाऊनलोड करणे, ऑनलाईन शॉपिंगला स्वतःचा मंच उपलब्ध करून देणे ह्यासारख्या सेवा हि उपलब्ध होतील. इ वॉलेट ची सुविधा 25 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended