राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर करतायेत डिजिटल दुनियेत प्रवेश | Digital Media News

  • 3 years ago
फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित दि मेन हू किल्ड गांधी (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे. याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended