Mumbai च्या Local रेल्वे मध्ये "ताई गिरी” | Mumbai Local Mafia | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
आजकाल आपल्या कानावर अनेक नवनवीन शब्द आणि कहाण्या येत आहेत. जसे दादागिरी, गांधीगिरी, भाईगिरी, आणि आता ताईगिरी . मुंबईकर नेहमी लोकल ने प्रवास करत असतो, महिलांच्या डब्ब्याला लागुनच सर्वसामान्य डब्बे असतात. पुरुषांच्या हाणामाऱ्या आपण अनेक बघितल्या असतील. परंतु
बायकांच्या हाणामार्या झाल्या कि त्या वेगळ्याच पातळींवर पोहचतात हे आपल्यापैकी अनेकांनी बघीतले असेल. कधीकधी त्या इतक्या विचित्र होतात कि केस ओढणे, अर्वाच्य शिव्या देणे, मारणे तर कधी कधी एकमेकींचे कपडे सुद्धा फाडायची मजल पोहचते. अशीच एक ताईगिरी ची घटना इंटरसिटी एक्स्प्रेस मध्ये
घडली. एका सीटवर सपना मिश्रा (19) हि बोईसर थिमस इंजिनिअरींग कॉलेज ची विद्यार्थिनी बसली होती. तिला रोज प्रवास करणाऱ्या महिलांनी उठायला सांगितले ती उठली नाही म्हणून तीन महिला प्रवाश्यांनी त्या मुलीला हात-बुक्क्यांनी मारण्याची घटना घडली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत
आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended