दीड कोटीसाठी छळ - चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना मुंबईत घडली | Lokmat Marathi News

  • 3 years ago
चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना मुंबईत घडली. भावेन शहा (३९) ह्यांचे ३१ ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले. शहा व त्यांचे वडील रसायन विक्री आणि वाहतुकीचा व्यवसाय करतात. अलीकडेच विकत घेतलेल्या नव्या टँकरच्या परवान्यासाठी ते ३१ ऑक्टोबर रोजी अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागात गेले होते. दुसऱ्या दिवशी खंडणीसाठी अपहरणकर्त्यांनी शहा कुटुंबाला घाबरवण्यासाठी आधी रक्तबंबाळ
अवस्थेत आणि नंतर नग्न अवस्थेत मारहाण करताना काही ध्वनिचित्रफीती पाठवल्या.या प्रकारामुळे शहा कुटुंब भेदरले, परंतु सदसदविवेकबुद्धीचा वापर करत त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवला आणि मदत मागितली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. दया नायक आणि निवडक अधिकाऱ्यांचे पथक
तयार करण्यात आले. पोलिसांनी शहा ह्यांच्या पत्नी यांना योग्य मार्गदर्शन करून अपहरणकर्त्यांना भेटण्यास तयार केले. आणि दीड कोटींची खंडणी देण्यापूर्वीच पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended