..आणि हा किताब जातोय सई ताम्हणकर यांना । And The Award Goes To Sai Tamhankar

  • 3 years ago
नेस्को आयटी पार्क येथे 27 ऑक्टोबर 2017 रोजी जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स 2017 हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध प्रकारचे परफॉर्मन्स हा सोहळ्याचा नेहमीचा प्लस पॉईंट असला तरी देखील या वेळेसचे रेडकार्पेट लूक्सही जोरदार होते. सई ताम्हणकरचा ब्ल्यू गाऊन विथ डायमंड नेकलेस विशेष लक्षवेधी ठरला. याव्यतिरिक्त सईसाठी फिल्मफेअरच हे तिसरं वर्ष विशेष ठरलं आहे. या वेळचा फिल्मफेअर अवॉर्ड्स सई ताम्हणकरसाठी नक्कीच विशेष होता. कारण फिल्मफेअर 2017 मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकनं होती – उत्कृष्ट अभिनेत्री- वजनदार आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फॅमिली कट्टा. सई ताम्हणकरला फॅमिली कट्टासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला . सईच्या सिनेमातील वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे. फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि त्यामुळे तिच्यासाठी हा विशेष होता. हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. याबाबत सई म्हणाली, ‘हो. हा माझा पहिला फिल्मफेअर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेअर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता, आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि तेही पहिला फिल्मफेअर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण, मी या सेलिब्रेशनवर जास्त वेळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended