रिक्शावाल्याचा मुलगा झाला क्रिकेटर | Autorickshaw Driver Son become Cricketer.

  • 3 years ago
रिक्शावाल्याचा मुलगा झाला क्रिकेटर |


न्युझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात दोन नव्या चेहर्‍यांना संधी देण्‍यात आली आहे. निवड समितीने मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना भारतीय संघात स्थान दिले आहे. २२ वर्षीय सिराज हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. हैदराबादच्या या क्रिकेटरचे वडील मोहम्मद घोस ऑटो रिक्षा चालक आहेत. दिवसभर ते रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. पण कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर सिराजने भारताच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न साकार केले आहे. आयपीएल १० मध्ये हैदराबाद सनरायझर्सने या उमद्या खेळाडूला २.६ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

सिराजने २०१५-१६ मध्ये रणजी सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून त्याने २ जानेवारी २०१६ मध्ये टी-२० सामने खेळण्यास प्रारंभ केला. तर २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदाच आयपीएलचे सामने खेळण्याची संधी मिळाली.

मोहम्मद सिराजला सनरायजर्स हैदराबादनं तब्बल २.६ कोटी रुपयांना विकत घेतले. मोहम्मद सिराज हा रिक्षा चालकाचा मुलगा आहे. भारताकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते. रणजी ट्रॉफीमधल्या माझ्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आज भारतीय संघात माझी निवड करण्यात आली. याचा खूपच आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया मोहम्मद सिराजने दिली आहे.

बंगळुरू येथे आयपीएल १० साठीच्या खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी या लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पुण्याच्या टीमनं स्टोक्सला तब्बल १४.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण हैदराबादच्या मोहम्मद सिराजने सुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Recommended