मोठे दावे करणा-यांचे पोट फाडून भाजपाचा विजय | Shivsena Lost | लोकमत मराठी न्यूज़
शिवसेनचे दारूण पराभव झाला आहे. ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणा-यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला हिणवले आहे.
भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११६ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीका केली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?’ असेही ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. त्यामुळे आता भाजपच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या जागृती पाटील यांना तब्बल ११,१२९ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना केवळ ६३३७ मते पडली आहेत. तर शिवसेनेने आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, सहानुभूती म्हणून जनता जागृती पाटलांना कौल देते, की पोटनिवडणुका जिंकण्यात माहीर असलेली शिवसेनाच बाजी मारते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने यात बाजी मारली.

Category
🗞
News