संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही

  • 3 years ago
नागपूर - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली. आरोप करणाऱ्या राहुल गांधींना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली.

Recommended