नाशकात कांदे-टोमॅटोला निचांकी भाव; उत्पादक हवालदील

  • 3 years ago
बेलगाव कुऱ्हे : एकीकडे नोटाबंदी आणि कॅशलेसच्या हायटेक प्रयत्नामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळत आहे. त्यासोबतच टोमॅटोनंतर आता कांद्यानेही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. इगतपूरी तालुक्यात चक्क 4 रूपये किलोच्या भावाने शेतकऱ्यांना कांदे विकावे लागत आहेत. मातीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे शेतातच सडत आहेत. इगतपूरीच्या घोटी बाजार समितीत मंगळवारी (दि.10) विक्रीसाठी आणलेला कांदा केवळ 200 ₹पोते आणि जेमतेम 4 ₹ किलो भावाने विकला गेला.

Recommended