Rain Updates Nashik (Nandgaon) : नांदगावात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, 'सकाळ'कडे मांडल्या व्यथा
  • 3 years ago
Rain Updates Nashik (Nandgaon) : नांदगावात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, 'सकाळ'कडे मांडल्या व्यथा

Nandgaon (Nashik) : नांदगाव येथील लेंडी नदी परिसरातील सर्व घरे वाहून गेल्याने घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून महिला आक्रोश करताना दिसल्या. गेल्या दोन दिवसांपासून सुरु सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर पाण्यात आपले दुकान वाहून गेल्याने आपली व्यथा सकाळ कडे मांडताना दिसले, काल पासून सुरू असलेला पाऊस (ता.७) मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता. परिणामी लेंडी व शाकांबरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आलेला नव्हता. ... भगवान हिरे परिणामी लेंडी नदीवरील सबवे ते रेल्वे स्थानकापर्यंत भुसावळ मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी झाले. रेल्वे स्थानकावर पाणी पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोहशिंगवे वालूर व मोरझर या क्षेत्रात प्रचंड मुसळधार राशी पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने लेंडी व शाकंबरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दहेगाव नाका गुलजारवाडी भागातील नागरिकांची घरे पाण्याखाली येवून दोन फुटाएवढे पाणी या भागातील घरात घुसले. तर दुसरीकडे लेंडी नदीच्या पाण्याला वाट मिळाले नाही.

व्हिडिओ - भगवान हिरे

#nandgaon #nashik
Recommended