"आणि काय हवं?", लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर...

  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणजेच अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा "आणि काय हवं?" या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेब सीरिजमधील त्यांची जूई आणि साकेत ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. तिसऱ्या सिझनमध्ये आता जुई आणि साकेतच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नातं कोणत्या वळणारवर आलंय हे पाहायला मिळणार आहे. या वेब शोच्या निमित्ताने उमेश आणि प्रियाने लोकसत्ता डिजिटल अड्डावर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.

#LoksattaDigitalAdda #UmeshKamat #priyabapat #anikayhav #webshow

Recommended