एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या करावी; स्वप्निलच्या आईचा आक्रोश

  • 3 years ago
स्वप्निल लोणकर याने पुण्यात आत्महत्या केल्याच्या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. ऐन उमेदीच्या काळात खचून गेल्यानं स्वप्निलनं टोकाचं पाऊल उचललं, पण निर्णयाने त्याच्या आईच्या काळजावर मोठा घावच घातला. मागच्या दोन वर्षांपासून स्वप्निलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केला आहे. 'मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं... दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,' असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला.

#pune #mpsc #students #swapnillonkar

Recommended