Pune : ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

  • 3 years ago
Pune : ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

फडणवीस खोटे बोलून
लोकांची दिशाभूल करत आहेत

- माजी आमदार मोहन जोशी

अँकर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींना असणारे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच संपुष्टात आले आहे. याप्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आरटीओ चौकात प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी आणि शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु, केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिलीच नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपविण्याचे कामच मोदी सरकार सातत्याने करत आहे. आणि माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ओबीसी आरक्षण प्रश्नात जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून या समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव मोदी सरकारचा आहे असा आरोप मोहन जोशी यांनी केला.

बाईट मोहन जोशी माजी आमदार

#mohanjoshi #OBCReservation #pune

Recommended