OBC Reservation:सामान्यांसाठी सध्याचे सरकार कर्दनकाळ- देशमुख

  • 3 years ago
बीड: परळी तालुक्यातील सिरसाळा गावातील परळी-बीड रोडवरील मुख्य मार्गावर ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी(ता.26) सकाळी चक्काजाम आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प बनली होती. जिल्हातील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून अनुदान, पिकविमापासून वंचीत राहीले,असा आरोप करून मराठा, ओबीसी, एससी पदोनती हे आरक्षण रद्द केल्याने असंतोष पसरला असून सामान्यांसाठी हे सरकार कर्दनकाळ असल्याची टीका भाजपा नेते माजी आमदार देशमुख यांनी केली. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे उत्तम माने, मुन्ना काळे, रोहीत देशमुख, बाबासाहेब काळे, बाळासाहेब पांडे, मोहन आचार्य, विकास पाळवदे, बळीराम गडदे, हनुमंत नागरगोजे, विनायक गडदे,रवी चाटे,गोविंद कांदे, आश्रूबा काळे, बालाजी बहिरे, आदींचा समावेश होता.

(व्हिडीओ- दिगंबर देशमुख)
#RastaRokoAndolan #BeedRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Beed #RTDeshmukh

Recommended