तौंते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार; महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता
  • 3 years ago
लक्षद्वीपजवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. या वादळाचं नाव तौंते असं आहे. १५,१६ आणि १७ तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १६ आणि १७ तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिलीय.
Recommended