बारामतीच्या 'मॉडर्न गोधडी'ला चक्क विदेशातून होतेय मागणी...

  • 3 years ago
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या व हातची कामे गेली. त्यामुळे अनेक कुटुंब हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत बेरोजगार महिलांच्या हाताला गोधडी शिवण्याचे काम देऊन अक्षर मानव संघटनेच्या कार्यकर्त्या झरीना खान यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.बारामतीची गोधडी देशासह परदेशात विकली जात आहे.बारामती येथील सावली अनाथ आश्रम'च्या 'माँ' अशी ओळख असणाऱ्या झरिना खान यांनी मागील आठ महिन्यांपासून बारामतीच्या ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना सोबत घेऊन महाराष्ट्राची 'गोधडी' ही संस्कृती जोपासत आहेत.