कोल्हापूर बुलेटीन | kolhapur| Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
1) बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात आज जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे 700 हून अधिक शाखांचे कामकाज बंद राहिले.
2)प्रतिबंधक उपाय योजनांचे उल्लंघन करून जमावबंदीचा आदेश असताना जमाव एकत्रित केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई तसेच वीज बिल भरणार नाही कृती समितीचे समन्वयक श्री निवास साळोखे बाबा पार्टे यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
3) वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्र्यांकडे केली
4) कोरोना महामारी नंतर एक दिवस आड सुरू असलेल्या माध्यमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रात सुरू
5)लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल भरणार नाही, असे ठणकावून सांगत महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्यासमोर वीज बिल भरणार नाही कृती समितीने राज्य शासन व समिती व संताप व्यक्त केला.
(बातमीदार : लुमाकांत नलवडे) ( व्हिडिओ : बी. डी. चेचर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended