पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु : पोलिस निरिक्षक मिलिंद मोहिते | Sakal |
  • 3 years ago
आमदार पडळकर यांनी पहाटे साडेपाच वाजता गडावर येऊन पुतळा अनावरण करण्याचा प्रयत्न केला.मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखले.त्यांनी दुरुनच
भंडारा उधळून घोषणा दिल्या.त्यानंतर ते तेथून निघून गेले.दरम्यान पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे अतिरिक्त पोलिस निरिक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितली.जेजुरीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.उद्या शनिवारी(ता.१३)रोजी शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
खंडोबा गडाच्या पायरीमार्गावर श्री.मार्तंड देवसंस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचा पुतळयाच्या उदघाटनाचा केलेला स्टंट
चुकीचा असल्याचे देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे व विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे म्हणाले की नियोजित कार्यक्रम शनिवारी होणार आहे.ज्येष्ट नेते शरद पवार यांच्या हस्ते
अनावरण होणार आहे.त्याची तयारीही जोरदार सुरु आहे.असे असताना या कार्यक्रमात सहभागी होण्याऐवजी पहाटे अंधारात येऊन स्टंट करणे एकदम चुकीचे
आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended