शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण | Kolhapur | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, चौथा मजला बांधकामाचा शुभारंभ खासदार श्री. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर पोलीस क्रीडांगणावर 39 रुग्ण वाहिकांचे लोकार्पण, दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरण, राजर्षी शाहू पुरस्कार वितरण तसेच आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, पी.एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ऋतुराज पाटील उपस्थित होते. 

बातमीदार - सदानंद पाटील

व्हिडीओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended